उत्रौली, ता. ३१ : वडगाव डाळ (ता.भोर) येथे झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांचे आणि बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या अवकृपेमुळे अनेक कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या नुकसानीची जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी पाहणी केली तसेच बाधित कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी थोपटे यांनी पावसामुळे घरांवरील उडालेली छपरे, शेतीचे झालेले नुकसानीची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे पूर्ण करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी तहसीलदार राजेंद्र नजन, पंचायत समिती सदस्या सुषमा चव्हाण, सहायक कृषी अधिकारी प्रथमेश दोडके, सुधीर खोपडे, संदीप गायकवाड, सागर बर्के तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
00461
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.