पुणे

उत्रौलीच्या रोहितची पोलिस दलात झेप

CD

उत्रौली, ता. १२ : उत्रौली (ता. भोर) येथील रोहित शिवाजी किर्वे याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणे शहर पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न साकार केले आहे. जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रोहितचे प्राथमिक शिक्षण उत्रौलीच्या जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण राजा रघुनाथराव विद्यालयात झाले. अनंतराव थोपटे महाविद्यालयातून त्याने पदवी पूर्ण केली. त्याचे वडील शिवाजी किर्वे गावातच शिलाई काम करतात, तर आई आशा किर्वे घरकाम करून संसाराला हातभार लावतात.
आई-वडिलांचे कष्ट पाहून रोहितने पोलिस होण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. भोर येथील अभ्यासिकेत त्याने दररोज १२ ते १४ तास अभ्यास केला. होमगार्ड म्हणून काम करत असतानाच त्याला पोलिस दलाची ओढ निर्माण झाली होती. अखेर कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. त्याच्या या यशात बहीण तेजस्विनी पवार व पालकांचे मोठे प्रोत्साहन लाभले.

00490

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT