पाटस, ता. ३ : पाटस-बारामती पालखी मार्गावर वासुंदे (ता.दौंड) हद्दीत घडलेल्या बॅंकेचे वसुली एजंट प्रवीण मळेकर याचा शुक्रवारी (ता.१) खून करण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपीला दौंड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाचे शोध घेतला. मात्र, तपासात आरोपीकडून खुनाचे मिळालेले धक्कादायक कारण ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांच्या आवाजाचा त्रास होतोय म्हणून आरोपीने अनोळखी दुचाकीस्वाराला अडवून त्याचा खून केला.
याप्रकरणी दीपक रामदास लोंढे (वय ३७, रा.वासुंदे ता.दौंड) यास पोलिसांनी शनिवारी (ता.१) रात्री अटक केली. पुणे येथील मळेकर हे बॅंकेचे खासगी वसुली एजंटचे काम करत होते. ते बारामतीला एका बॅंकेचे वसुली नोटीस देण्यासाठी गेले होते. दिवसभर काम ओटोपल्यानंतर सायंकाळी ते बारामती-पाटस पालखी मार्गाने पुण्याकडे निघाले होते. रात्री पावणे आठच्या सुमारास ते वासुंदे हद्दीत येताच कोणीतरी व्यक्तीने त्यांच्या पोटात धारदार सुरा भोकसला. यामुळे मळेकर यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला.
याप्रकरणी यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. श्वान पथकासही पाचारण केले. तसेच स्थानिक चौकशीत परिसरातील एकाकडून रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर अनेकदा दगड फेकीचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काही तासात संशयित आरोपी दीपक लोंढे यास ताब्यात घेतले. यावेळी खुनाचे धक्कादायक कारण समोर आले.
दरम्यान, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे यांच्यासह पोलिस पथकाने कामगिरी केली.
00271
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.