पुणे

अतिविषारी सापाचा दांपत्यासोबत दुचाकीवरून प्रवास

CD

अमर परदेशी : सकाळ वृत्तसेवा
पाटस, ता. ३ : अगदी काही अंतरावर जरी साप नजरेस पडला तरी आपला थरकाप उडतो. मात्र, पटेरी मण्यारसारख्या अतिविषारी सापासोबत दुचाकीवरून प्रवास करण्याचा योग आला तर..? ही कल्पनाच काळजाचे ठोके चुकविल्याशिवाय राहणार नाही. मात्र, हा प्रसंग अनुभवला आहे खोमणे दांपत्याने... त्यांनी सापासोबत तब्बल तेरा किलोमीटरपर्यंत दुचाकीवरून प्रवास केला.

पाटस (ता.दौंड) येथील शिक्षक सखाराम खोमणे व त्यांच्या पत्नी वैशाली या दांपत्याने रात्रीच्यावेळी घरी गेल्यानंतर सर्पराज दुचाकीच्या हॅंडेलवर बसलेले पाहिले. ते पाहून त्यांच्या पायाखालची वाळू तर सरकलीच पण ऐन थंडीत त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. हा साप साधासुधा नव्हता तर चक्क अतिविषारी पट्टेरी मण्यार होता. केवळ नशीब बल्लवत्तर म्हणून खोमणे पतिपत्नीवरील जीवघेणे संकट टळले.

पाटस येथील खोमणे त्यांच्या मूळगावी वासुंदे येथे गेले होते. दिवसभरातील काम उरकून सायंकाळी ते घराकडे निघाले. त्यावेळी त्यांना घराच्या बाजूला साप दिसला. मात्र, अंधूक प्रकाशात तो काही क्षणात दिसून असा झाला. काही वेळाने दोघेही पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीकडे आले. दोघेही दुचाकीवर बसून पाटसकडे निघाले. वासुंदे ते पाटस हा तेरा किलोमीटरचा प्रवास त्यांनी थंडीत पार केला. पाटस येथे त्यांच्या घरासमोर आल्यानंतर त्यांनी दुचाकी उभी केली. यावेळी सखाराम यांना दुचाकीच्या हॅंडलवर काहीतरी हालचाल दिसली. त्यांनी मोबाइलची बॅटरी लावून पाहिले. तर काळाकुट्ट रंगाचा पट्या असणारा साप समोरील हेडलाइटमध्ये जाताना दिसला. हे दृष्य पाहून त्यांची बोबडीच वळली. त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी मोठ्याने ओरडत दुचाकीवरून बाजूला उडी मारली.

दरम्यान, प्रसंगावधान राखून खोमणे यांनी सर्पमित्राला बोलावले. यावेळी त्यांनी गॅरेजमधील एका फिटरला बोलावले. त्याने जिवमुठीत घेऊन दुचाकीचा एक एक भाग बाजूला काढला. अखेर एका भागात हे साप बसलेला आढळून आला. सर्पमित्राने अडीच ते तीन फुटांची लांबीच्या पट्टेरी मण्यारला शिताफीने बाहेर काढले अन्‌ अखेर सर्वांचा जीव भांड्यात पडला. सापाने सखाराम यांना कोणतीही इजा केली नाही, याबाबत ग्रामस्थांनी देवाचे आभार मानले.

00621

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : पनवेलजवळ मालगाडीचे रुळावरून घसरण्याचे प्रकरण!

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT