पुणे

भागवतवाडी भाग शाळेतील वर्गात साप

CD

पाटस, ता. १७ : पाटस (ता. दौंड) येथील भागवतवाडी जिल्हा परिषद भाग शाळेमध्ये चक्क खिडकीतून वर्गामध्ये साप आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी शिक्षिका के. टी. शेख यांचे खिडकीत लटकलेल्या सापाकडे लक्ष गेल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या प्रकाराने संबंधित शिक्षिका व विद्यार्थी भयभीत झाले. अखेर, सर्पमित्रांमार्फत सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या बाजूला भागवतवाडी भागात जिल्हा परिषद भाग शाळा आहे. या शाळेची विद्यार्थिसंख्या २२ आहे. सकाळी दहा वाजता वर्गशिक्षिका शेख व एस. एस. दिवेकर यांनी शाळा सुरू करण्यासाठी वर्गखोली उघडली. शेख यांचे वर्गात जाताच खिडकीकडे लक्ष गेले. त्या वेळी भला मोठा साप वर्गाच्या आतील खिडकीत दिसून आल्याने त्या प्रचंड घाबरल्या. वर्गात साप असल्याने मुलांना वर्गात येण्यास मज्जाव केला आणि सर्पमित्रांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. काही वेळाने आलेल्या सर्पमित्रांनी सापाला पकडताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. या वेळी खिडकीच्या बाहेरील बाजूला आणखी एका सापाचे दर्शन घडले.
दरम्यान, खिडकीच्या जाळीला छिद्र असल्याने त्यामधून हा साप आल्याचे दिसून येत होते. शाळेच्या बाजूला घाणीचे साम्राज्य असल्याने येथे घोणस सापाचे दर्शन होत असते. आज साप खिडकीतून वर्गात आल्याच्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भाग शाळेच्या दोन नवीन वर्गखोल्यांना मंजुरी मिळालेली आहे, परंतु पुढील कार्यवाही लाल फितीत अडकल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

T20 World Cup: औपचारिकता गांभीर्याने पूर्ण करणार; भारताचा आज नेदरलँड्ससोबत टी-२० विश्वचषकचा अखेरचा साखळी सामना!

Gold Rate Today : तीन दिवसांत सोनं ₹6,500 तर चांदी ₹20,000 ने स्वस्त! भाव घसरले तरीही दागिने खरेदीत मंदी; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Raigad Ropeway रायगडला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रोपवे सेवा ६ दिवसांसाठी बंद

SCROLL FOR NEXT