पुणे

अज्ञात वाहनाच्या धडकेत पाटस येथे दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

पाटस, ता. ४ ः पुणे-सोलापूर महामार्गाच्या पाटस (ता. दौंड) हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. महामार्गावरील बारामती फाटा येथे शनिवारी (ता. ३) सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ही घटना घडली. गजानन मुकुंद शेलार (वय ५९ रा. पाटस-तामखडा, ता. दौंड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भाऊसाहेब शेलार यांनी पाटस पोलिस चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब गाडेकर यांनी माहिती दिली.
गजानन शेलार हे पाटस येथील तामखडा भागातील रहिवासी आहेत. शनिवारी सायंकाळी ते मळद येथील शेतातील काम उरकून दुचाकीने पुणे-सोलापूर महामार्गाने पाटसकडे येत होते. महामार्गावरील बारामती फाटा येथे येताच पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर अज्ञात वाहन तिथे न थांबता निघून गेले. वाहनाच्या धडकेत शेलार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. जोराचा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेलार यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पाटस पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली. दरम्यान, मागील काय दिवसांपासून बारामती फाटा परिसरात अपघाताची मालिका सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT