पुणे

पाटसमध्ये हाॅटेल चालकाचा खून

CD

पाटस, ता. १४ : पाटस (ता. दौंड) येथे एका हाॅटेल चालकाचा मंगळवारी (ता. १४) पहाटे खून झाला. बबन उघडे (वय ३१, रा. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी अशरफ अस्लम शेख (वय २४, रा. सदर बाजार, सातारा; सध्या रा. पाटस) याला काही तासांतच अटक केली.
याबाबत सारिका गपाट यांनी पाटस पोलिस चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार उपनिरीक्षक विजय कोल्हे यांनी माहिती दिली की, विश्वास उघडे यांचा पाटस येथे महामार्गालगत हाॅटेल व्यवसाय आहे. सोमवारी (ता. १३) रात्री ते हाॅटेलच्या बाहेर झोपले होते. पहाटेच्या सुमारास आरोपी अशरफ शेख यांनी घरगुती वादाचा राग मनात धरून त्यांच्यावर लोखंडी पाइपने हल्ला चढविला. त्यांच्या तोंडावर व डोक्यात वर्मी घाव घातले. गंभीर जखमी झाल्याने उघडे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ते रक्ताच्या थारोळ्यात दिसल्याने हा प्रकार लक्षात आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, फौजदार विजय कोल्हे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. दरम्यान, पोलिसांनी पथक पाठवून बाहेरच्या जिल्ह्यातून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस अधिकारी कोल्हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित!

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT