पुणे

कोऱ्हाळे येथे भाजपची आढावा बैठक

CD

वडगाव निंबाळकर, ता. २७ : कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे जनजागृतीद्वारे सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच परिसरात केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक येथे नुकतीच पार पडली.
यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील यांनी कार्यकर्त्यांकडून काम करताना येणाऱ्या अडीअडचणी समस्यांची माहिती घेतली. मोदी सरकारने पीएम किसान योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खात्यात थेट दरवर्षी सहा हजार रुपये जमा होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत आहे. तसेच पंतप्रधान मुद्रा योजनाअंतर्गत बिगर कॉर्पोरेट बिगर कृषी लघु किंवा सूक्ष्म उद्योगांशी संबंधित लोकांना दहा लाख रुपयांची कर्ज दिले जाते. तसेच आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आदींचाआढावा यावेळी घेतला.
यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा उपप्रमुख देवेंद्र बनकर, यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, भाजप ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खामगळ, उदय पेशवे, अंजली खजिनदार, विनोद खोमणे, जागृती बुराडे, प्रशांत लव्हे, सागर धापटे, उमेश गायकवाड, पृर्थ्वीराज नलावडे, मनोज खोमणे, नंदू खोमणे, चेतन सोलनकर इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

01779

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

Latest Marathi News Live Update : चीनमध्ये भूस्खलनात वाहून गेला हायवे; भीषण अपघातात सुमारे 19 ठार - रिपोर्ट

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT