पुणे

कत्तलीसाठी नेणाऱ्या वासरांची पोलिसांकडून सुटका

CD

वडगाव निंबाळकर, ता. ६ : खराडेवाडी (ता. बारामती) येथील शिर्सुफळ फाटा येथे पोलिसांनी कत्तलीसाठी गाईची वासरे घेऊन जाणारी जीप पकडली. यामध्ये २२ वासरे होती.
वडगाव निंबाळकर येथील पोलिसांनी सोमवारी (ता. ५) ही कारवाई केली.

पोलिस ठाण्याला डायल ११२ कडून यासंबंधीची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक लागलीच खराडेवाडी (ता. बारामती) येथे पोहोचले. तेथे शिर्सुफळ फाटा येथे जीप पोलिसांनी अडवली. चालकाला नाव विचारले असता, त्याने श्रीकांत जगताप (रा. काऱ्हाटी, ता. बारामती) असे सांगितले. पीकअपच्या पाठीमागील हौद्याची पोलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये जर्सी गाईची २२ वासरे अत्यंत निर्दयीपणे भरण्यात आली होती. साधारण दोन ते १५ दिवस या वयाची ही वासरे होती. याबाबत चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्याच्याकडे जनावरांची वैद्यकीय तपासणी केल्याचे कोणतेही प्रमाणपत्र नव्हते. तसेच जनावरे वाहतुकीचा परवाना नव्हता. यामुळे जगताप (रा. काऱ्हाटी, ता. बारामती) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT