पुणे

लोणीभापकर मुढाळे परिसरामध्ये लांडग्याच्या हल्ल्यात १७ कोकरे ठार

CD

वडगाव निंबाळकर, ता. २६ : लोणीभापकर मुढाळे (ता. बारामती) गावच्या हद्दीवर टेंगलेवस्तीजवळ लांडग्यांच्या हल्ल्यात सुमारे सतरा मेंढ्यांची पिले (कोकरू) ठार झाली. ही घटना मंगळवारी (ता. २५) दुपारी ११ वाजता घडली.
सोमा भिवा टेंगले यांच्या शेतात आबा हिरामण नानवर (रा. मुर्टी) या मेंढपाळाच्या मेंढ्या बसल्या होत्या. सकाळी मेंढ्या चरायला बाहेर गेल्यानंतर पिल्ले जाळीमध्ये ठेवली होती. आजूबाजूला उसाची शेती असल्यामुळे शेतातून आलेल्या लांडग्याने पिलांवर हल्ला केला. यामध्ये सुमारे सतरा पिलांचा मृत्यू झाला, असे नानवर यांनी सांगितले. दरम्यान, घटनेनंतर वनमजूर गोरख भापकर, सोमनाथ जाधव वनपरिमंडल अधिकारी अमोल पाचपुते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, दहा पिलांचे अवशेष सापडले असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. लांडग्यांच्या हल्ल्यामुळे हा प्रकार घडल्याने वनविभागाकडून सांगण्यात आले.
मृत पिलांच्या पंचनाम्यानुसार योग्य ती भरपाई मिळण्याबाबत कागदपत्रांची पूर्तता करून वरिष्ठांकडे पाठवण्यात येतील, अशी माहिती तालुका वनाधिकारी शुभांगी लोणकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणे पोलिसांच्या रडारवरील 'बबलू' कोण? इन्स्टाग्रामवर फोटो टाकायचा, अन् गुपचूप चालायचा पिस्तुलांचा धंदा; अखेर पकडला

Vaibhav Sooryavanshi पर्यंत रघूनं पोहचवली टीम इंडियाची जर्सी, १५ वर्षांच्या पोराची कशी होती रिऍक्शन? BCCI ने शेअर केला Video

Samruddhi Mahamarg Accident : फॉर्च्युनर सळ्यांच्या कंटेनरला मागून धडकली; डॉक्टर पतीसह पत्नीचा मृत्यू, मुलांसह तिघे जखमी

कोण आहेत जॉर्ज कुरियन? केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? कारण आलं समोर

Power Supply Restoration: शेतकऱ्यांना दिलासा! उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT