पुणे

वडगाव निंबाळकरमधील रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे अपघाताचा धोका

CD

वडगाव निंबाळकर, ता. २३ ः नीरा-बारामती मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. वडगाव निंबाळकर येथील रस्ता रुंदीकरणानंतर साइडपट्ट्या न भरल्यामुळे अपघात होत आहेत.

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर साखर वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक रस्त्यावरून साइडपट्टीवर उतरला तीव्र उतार असल्यामुळे चालकांने प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवत, वाहन रोखले. यामुळे अपघाताचा धोका टाळला. गेल्या दोन महिन्यांत अनेक वेळा या ठिकाणी वाहने रस्त्याखाली जाण्याचे प्रकार घडत आहेत. दुचाकी वाहनचालक अपघातामुळे जखमी होत आहेत. नीरा-बारामती मार्गावरील ढोले वस्ती ते वडगाव निंबाळकर या मार्गाचे रुंदीकरणाचे काम झाले. यामध्ये रस्त्याच्याकडेची झाडे काढली. परंतु, काही ठिकाणी रुंदीकरणानंतर साइडपट्ट्या मुरूम भरून घेणे गरजेचे होते. परंतु, साइडपट्टीचे काम झाले नाहीत, परिणामी सातत्याने अपघात होत आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळेजवळ रस्त्याचे रुंदीकरण गरजेचे होते. परंतु, सुमार दर्जाचे काम आणि नेमलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट न दिल्यामुळे कामात चालढकल करण्यात आल्याचा आरोप पालकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT