पुणे

उंडवडीतील अपघातप्रकरणी वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल

CD

वडगाव निंबाळकर, ता. २ : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे सुपे रस्त्यावर शिंदेवस्तीजवळ दुचाकीला पाठीमागून उडविलेल्या मोटर चालकाविरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात एक वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या वर्षी १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाच सुमारास प्रमोद ईश्वर मांढरे यांच्या दुचाकीला अमोल राजाराम गवळी यांच्या मोटारीने पाठीमागून येऊन धडक दिली होती. यामध्ये दुचाकी चालक प्रमोद मांढरे हे गंभीर जखमी झाले होते. दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी प्रमोद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल यांच्या चारचाकी गाडीने जाणीवपूर्वक ठोस दिली. यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मारल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. सुरुवातीला पोलिसांनी अपघात असल्याचे सांगून नोंद करण्याची तयारी केली.
नातेवाइकांनी सर्व हकिगत सांगितल्यानंतर अमोल यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. सरकारी वकील यांनी सदरचा प्रकार हा अपघात नसून, खून असल्याचा युक्तिवाद केला. आरोपीने पूर्व नियोजन करून थंड डोक्याने केलेला खूनच आहे. त्याचा तपास करण्यासाठी जास्तीत जास्त पोलिस कोठडीची मागणी केली होती.
याबाबत फिर्यादीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटीशन दाखल केले होते. न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना खुलासा प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देऊन सरकारी वकिलांना या प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याचे आदेश दिले. अखेर न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी पुढील तपास सुरू करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. खुनाचा गुन्हा नोंदवला.
फिर्यादी पक्षातर्फे मुंबई उच्च न्यायालयात ॲड. प्रशांत जी. भापकर, ॲड. साक्षी माने व ॲड. स्वाती सिंग यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

Nashik News : नाशिककरांनो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त उद्या वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर असेल प्रवेशबंदी

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

Bank Holiday: उद्या बँकांना सुट्टी? ईदमुळे 21 मार्चला तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती

'आमच्याकडे ‘जिन’ आहे, तो सर्व इच्छा पूर्ण करतो' म्हणत तरुणीची फसवणूक, अडीच वर्षांत १६ लाख रुपयांनी घातला गंडा

SCROLL FOR NEXT