पुणे

योग्यता प्रमाणपत्रांशिवाय वाहने रस्त्यावर

CD

वडगाव निंबाळकर, ता. ३० ः व्यावसायिक वाहनांना योग्यता प्रमाणपत्र घेतल्याशिवाय वाहन रस्त्यावर चालवून व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. परंतु, आरटीओच्या दुर्लक्षामुळे अनेक वाहने योग्यता प्रमाणपत्र न घेता रस्त्यावर व्यवसाय करत आहे.

नवीन व्यावसायिक वाहनांसाठी दर दोन वर्षांनी तर जुन्या वाहनांना दरवर्षी आरटीओ कार्यालयात जाऊन वाहन सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी वाहनांची तपासणी होते. यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. पण, आरटीओ कार्यालयाशी आर्थिक हितसंबंध ठेवून काही व्यावसायिकांनी योग्यता प्रमाणपत्र न घेता आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा आपले नाव यादीत समाविष्ट करत व्यवसाय सुरू ठेवल्याचे चित्र बारामती आरटीओ कार्यालयाअंतर्गत बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यांतून दिसून येत आहे.

बारामती आरटीओ कार्यालयाअंतर्गत सुमारे ४०० स्कूलबस आहेत. विविध भागात ही वाहने विद्यार्थी वाहतूक करतात. यामधून निम्या वाहनांकडे योग्यता प्रमाणपत्रे नाहीत. जून महिन्यात सर्व स्कूल बसची तपासणी होऊन मगच व्यवसायाला परवानगी मिळते. पण, बारामती आरटीओकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी पाकीट संस्कृती रुजू लागली आहे.

याच धर्तीवर अवजड वाहतूक करणारी हायवा वाहनांची स्थिती आहे. अनेक वाहने नंबर प्लेट न लावता शहरातून गर्दीच्या ठिकाणातून जातात. यावेळी आरटीओ पथकाच्या ही गोष्ट निदर्शनास कशी येत नाही, असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होतो. कायद्याचा बडगा उगावरून वैयक्तिक हित साधण्याची पद्धत बदलणार कधी? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार असल्याची माहिती वाहतूकदारांनी दिली.
गेल्या आठवड्यात माझी गाडी तपासणी पथकाने पकडली. कागदपत्रांची पूर्तता होती. यामुळे दंडात्मक कारवाई करता आली नाही म्हणून, गाडी वजन काट्यावर नेऊन तपासणी केली. यातही काही त्रुटी आढळून आली नाही. परिणामी सोडून देण्यात आले. समोरून यादीतील गाड्या वाहतूक करत असताना कोणतीही कारवाई झाली नाही.

कारवाई करताना कोणताही भेदभाव केला जात नाही. समोर असणाऱ्या वाहनांची कागदपत्रे तपासून दंड आकारला जातो. कागदपत्रांची पूर्तता असूनही दंड आकारला असेल तर कार्यालयाशी संपर्क साधावा.
- राजेंद्र केसकर, उपविभागीय परिवहन अधिकारी, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT