पुणे

वडगाव निंबाळकरला मशिदीत इफ्तार पार्टी

CD

वडगाव निंबाळकर, ता. २८ : ‘‘मुस्लिम बांधव रमझान महिन्यात कुरान पठण करतात, प्रवचन ऐकतात, उपवास करतात, जास्तीत जास्त पुण्य (नेकी) मिळवण्याचा प्रयत्न करतात. निष्ठेने केलेले काम फलदायी ठरते,’’ असे मत वडगाव निंबाळकर(ता. बारामती) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी व्यक्त केले.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने येथील मशिदीमध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी काळे यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. उपवास पूर्ण करणाऱ्या बांधवांचे कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘‘आपल्या आजूबाजूला काही अघटित घडत असेल तर त्वरित पोलिसांची संपर्क साधावा. आपल्या तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल.’’
यावेळी अजित मनेर, शाबुद्दीन मनेर, सिकंदर भालदार, राजमहम्मद आतार, टिपू भालदार, अनसर बागवान, चांद बागवान, इक्बाल शेख, सलमान पठाण, सादिक बागवान, कय्यूम पठाण, जहाँगीर शेख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

भारताच्या प्रगतीचं पाककडून कौतुक! भारत खूप पुढे गेलाय आम्ही मागे आहोत...पाकिस्तानी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

मुंबईकरांसाठी दिलासा! ११ किमीचा सिग्नल-फ्री कॉरिडोर तयार; ट्रॅफिकमधून सुटका होणार, मार्ग कुठून कुठे असणार?

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये चालकाला बेदम मारहाण; २८ हजारांची लूट

SCROLL FOR NEXT