चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर : होळ (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपूर्ण कारभार सध्या फक्त एका खोलीतच सुरू आहे. तपासणी, नोंदणी, औषध वितरण अशा सर्व प्रक्रिया एका जागीच पार पडत असल्याने रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. डॉक्टरांना बसल्या जागीच रुग्ण तपासावे लागत असून, गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णांची हेळसांड सुरू आहे. त्यामुळे आरोग्य सेवेची स्थिती अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र आहे.
राज्यात ‘‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’’ उपक्रमांतर्गत आधुनिक सुविधा असलेली केंद्रे उभारली जात आहेत. त्यात होळ केंद्राचाही समावेश आहे. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून इमारतीचे व सुशोभीकरणाचे काम सुरू असून त्याचा वेग अत्यंत संथ असल्यामुळे रुग्णसेवेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली होती. ठेकेदाराला काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अधिकाऱ्यांच्या आदेशांकडे ठेकेदाराने दुर्लक्षच केले. त्यामुळे अजूनही केवळ एका खोलीतच सेवा सुरू आहे. सध्या तपासणीला आलेल्या रुग्णांना खुर्चीवर बसवूनच आरोग्य सल्ला दिला जातो. औषध वितरण, नोंदणी आणि तपासणी हे सर्व एकाच ठिकाणी चालू असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण होते.
दुपारनंतर मात्र केंद्रात कोणतेही कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना परत जावे लागते.
सध्या केंद्रात एकूण १४ कर्मचारी कार्यरत असून, सकाळच्या सत्रात फक्त वैद्यकीय अधिकारी व चार कर्मचारी उपस्थित असतात.
दररोज किमान ६० ते १२० रुग्ण तपासणीसाठी येतात. इमारतीचे काम सुरू असल्याने थोडी गैरसोय होत आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर सेवा पूर्ववत सुरळीत होईल.
- डॉ. कर्नवीर शिंदे, वैद्यकीय अधिकारी
मी अनेकदा उपचारासाठी आले. पण खोकल्याचे औषध मिळाले नाही. डॉक्टरांशी नीट संवाद होत नाही.
- शीतल साळवे, रुग्ण
पायाला जखम झाल्याने उपचारासाठी आलो होतो. दुपारनंतर कर्मचारी नसल्याने डॉक्टरांनी ‘घरी गेल्यावर जखम धुवा’ असा सल्ला देऊन औषध देऊन पाठवले.
- लोहजीत तांबे, ज्येष्ठ नागरिक, मुरूम.
आरोग्य केंद्राचा आढावा
वैद्यकीय अधिकारी : ३
केंद्राच्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्या : सुमारे ५० हजार
उपकेंद्रे : ८
एकूण आरोग्य कर्मचारी : सुमारे ८०
2908
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.