पुणे

वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे कोऱ्हाळे येथील ग्रामस्थ त्रस्त

CD

वडगाव निंबाळकर, ता. २५ ः कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील लव्हेवस्ती- खोमणेवस्ती रस्त्यावरील वाढत्या कचरा समस्येमुळे ग्रामस्थ संतापले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. या समस्येबाबत सुनील सुरेश खोमणे यांनी येथील रहिवाशांच्या सहमतीने ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे.
या भागात उघड्यावर कचरा टाकल्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उघड्यावर कचरा टाकण्याबाबत लोकांना तोंडी सूचना देऊनही काही व्यक्ती उघड्यावर कचरा टाकत आहेत. ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, कचरा टाकण्यास मनाई, असे फलक लावून घंटागाडीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा दावा करणाऱ्या ग्रामपंचायतींनी प्रत्यक्षात स्वच्छता राखण्यास असमर्थता दाखवली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा अभाव आणि प्रशासनातील निष्क्रियता, त्यामुळे या भागात शिस्त राहिली नाही. ग्रामपंचायतीने साफसफाई करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी. वेळेत कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून उघड्यावर टाकला गेलेला कचरा त्वरित नष्ट करण्यात येईल. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
- राजेंद्र शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT