वडगाव निंबाळकर, ता. १ ः नीरा- बारामती मार्गावर निंबूत (ता. बारामती) येथील मोटर अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. १) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. नीरा बाजूने मोटारीमधून (क्र. एमएच ४२ बीएस ४७८३) दोघेजण वडगाव निंबाळकरच्या दिशेने येत होते. निंबूत गावच्या हद्दीत लक्ष्मीनगरजवळ वाहनावरचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला मोटार धडकली. यामध्ये आदित्य तानाजी चव्हाण (वय २१, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) याचा मृत्यू झाला. सहप्रवासी जखमी झाला असून, पुणे येथे उपचार घेत आहे. शवविच्छेदन अहवाल आणि सहप्रवाशाचा जबाब नोंदविल्यावर अपघाताचे कारण कळून येईल, अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.
02932
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.