पुणे

वडगाव पोलिसांची अवैध गुटखा, दारू प्रकरणी कारवाई

CD

वडगाव निंबाळकर, ता. २७ ः गुटख्याची मोटारीतून अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीस वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे. तसेच, दुसऱ्या एका कारवाईत अवैधरित्या देशी- विदेशी दारू विकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. दोन्ही कारवायांमध्ये आठ लाख सहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
वैभव बाळासाहेब चांदगुडे (रा. दंडवाडी, सुपा, ता. बारामती) असे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (ता. २६) सकाळी साडेनऊ वाजता नीरा- मोरगाव रस्त्यावर चौधरवाडी गावच्या हद्दीत पोलिसांनी संशयित मोटार (क्र. एमएच ४२ एएच ९३५३) थांबवून पाहणी केली. गाडीमध्ये पांढऱ्या रंगाची पोती दिसून आली. वाहन पोलिस ठाण्यात आणून पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला विमल पान मसाला व गुटखा असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत ह्युंदाई कंपनीची मोटार व प्रतिबंधित गुटखा असा तीन लाख ९७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
दुसऱ्या कारवाईत लोणी भापकर (ता. बारामती) येथे अनिता दिलीप लोंढे ही महिला बेकायदेशीरपणे देशी- विदेशी व गावठी दारू जवळ बाळगून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता एक मोटारीमध्ये (क्र. एमएच १२ बीजे ११४५) देशी- विदेशी व गावठी हातभट्टीचा साठा मिळून आला. ही मोटार व दारू पोलिसांनी जप्त केली. लोंढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत चार लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही कारवायांमध्ये पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

SCROLL FOR NEXT