पुणे

वाघळवाडीतील ट्रॅक्टर चोरट्यास बेड्या

CD

वडगाव निंबाळकर, ता. २ : सोमेश्वर साखर कारखाना परिसरातील वाघळवाडी (ता. बारामती) येथून ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या चोरट्याला मुद्देमालासह अटक करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले आहे. शुभम चंद्रकांत इंगळे (रा. राजुरी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे
प्रसाद विजय सोनवणे (रा. न्हावी, ता. भोर) यांनी ट्रॅक्टर चोरीची तक्रार ३० जानेवारी २०२६ रोजी दाखल केली होती. महिंद्रा अर्जुन कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (क्र. एमएच १२ वायएन ८४४६) रात्री वाघळवाडी परिसरातून चोरट्याने पळवून नेला होता. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयावरून शुभमला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने ट्रॅक्टर चोरल्याची कबुली दिली. आरोपी शुभम ट्रॅक्टर व्यावसायिक आहे. स्वतःचे दोन ट्रॅक्टर आहेत. त्याच्या मित्राला ट्रॅक्टर खरेदी करायचा होता. मित्राला चोरलेला ट्रॅक्टर विकण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी कारखान्यावरून ट्रॅक्टर पळवून नेला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी शुभमला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने जेजुरी (ता. पुरंदर) येथे चोरलेला ट्रॅक्टर लावला असल्याचे सांगितले. ट्रॅक्टर लावताना अपघात झाला आहे, असे सांगून एका घरासमोर ट्रॅक्टर लावून आरोपी शुभम निघून गेला होता. दरम्यान, चोरलेला ट्रॅक्टर विकण्याचा प्रयत्न केला. परंतु, खरेदी करणाऱ्या व्यक्तींनी कागदपत्र मागितली, यामुळे लगेच विक्रीचा प्रयत्न फसला.
चोरीला गेलेला नऊ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला. आरोपीला सोमवारी (ता. २) बारामती न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार कुंडलिक कडवळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT