वडगाव निंबाळकर ता. १६ ः मुढाळे (ता. बारामती) येथील लोखंडवाडी मेंढपाळ वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांची प्रभावी सादरीकरणे करून पालक व उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. अवघ्या ३१ विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेतील मुलांमध्ये दडलेली कला आणि आत्मविश्वास पाहून पालकही भारावून गेले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, वक्तृत्व आदी विविध सादरीकरणांतून आपली क्षमता दाखवून दिली. शिक्षकांनी घेतलेली परिश्रमपूर्वक तयारी आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे कार्यक्रम रंगतदार ठरला. आपली मुले खरंच हुशार आहेत, मराठी शाळा खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे, अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य बाबा चोरमले, वडगाव निंबाळकरचे सरपंच सुनील ढोले प्रमुख उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक नारायण सावंत, शिक्षिका वैशाली सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर कारंडे, उपाध्यक्ष सदाशिव कारंडे, आनंदा कारंडे, मारुती कारंडे, तायडाबाई कारंडे, सारिका कारंडे, तानाजी कारंडे, नवनाथ जानकर, सुवर्णा जगताप, मालन कारंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
03001
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.