पुणे

नऊ गावांचा वीजपुरवठा खंडित

CD

वडगाव निंबाळकर, ता. १६ : सोमेश्‍वर उपविभागांतर्गतच्या ३३ केव्ही वीजवाहिनीची दुरुस्ती व पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल कामांमुळे वडगाव निंबाळकर (ता. बारामती) परिसरातील नऊ गावांत गुरुवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला. तळपत्या उन्हामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. याबाबतीत महावितरणकडून समाजमाध्यमांद्वारे पूर्वसूचना देण्यात आली होती.
तळपत्या उन्हात वीजपुरवठा बंद झाल्याने घामाच्या धारांनी सर्वसामान्य हैराण झाले. वीज खांबांभोवती वाढलेली झाडेझुडपे, काटेरी झाडे काढणे, वीजवाहक तारांवरील अडथळे दूर करणे व वीजवाहिनी सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. उन्हाळ्यात ही कामे सोयीस्कर असल्याने दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला.
दुरुस्तीमुळे वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे, जायपत्रेवाडी, वाकी, चोपडज, मगरवाडी, होळ आदी गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या उष्णतेमुळे शेती व पिण्याच्या पाण्याची गरज वाढली असताना दीर्घ काळ वीज नसल्याने नागरिकांना त्रास झाला.

पावसाळ्यात ही कामे शक्य नसल्याने पूर्वतयारी म्हणून दुरुस्ती केली. काही ठिकाणी वीजवाहक तारांवर काटेरी झाडांमुळे धोका होता. एक दिवस झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
- सचिन क्षीरसागर, कनिष्ठ अभियंता, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

Latest Marathi News Live Update : बंगळुरूमध्ये ऑटो एलपीजीचा पुरवठा ३०० टक्क्यांहून अधिक वाढवला

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

ABMSS : साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी ‘बाहेर’चे सल्लागार; मसापचे अध्यक्ष योगेश सोमण यांची माहिती

SCROLL FOR NEXT