पुणे

दुष्काळी गावांना मोसंबी लागवडीची गोडी

CD

वडापुरी, ता.७ : इंदापूर तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा रेडा, काटी, रेडणी या परिसरात सध्या शेतकरी मोसंबी बागांच्या लागवडीकडे वळला आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागांची लागवडी केल्यामुळे रेडा काठी रेडणी हे गाव मोसंबीच्या बागांचे आगार बनले आहे, असे शेतकरी बाळासाहेब सोनटक्के यांनी सांगितले.

तालुक्यात शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या डाळिंबाची लागवड करून आपला उदरनिर्वाह करत होता. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यावर होणारा औषधांचा खर्च, मेहनत व रोगराई या नुकसानीमुळे बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या. यामुळे शेतकरी मोसंबी बागांच्या लागवडीकडे वळाला असल्याचे चित्र या परिसरात तालुक्यात पहावयास मिळत आहे.

वाढत्या खताचा खर्चात बचत
मोसंबी बागांना लागणारे खत घरच्या घरी शेतकरी तयार करत आहेत. शेळ्या मेंढ्याचे मलमूत्र रोजचे रोज निर्माण होत असल्याने खताचा खर्च वाचत आहे तसेच औषधे कमी लागत असल्याने औषधांचाही खर्च कमी होत आहे. मोसंबीला बाजारात चांगले दर मिळत असल्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखले जाणाऱ्या बावीस गावात सध्या मोठ्या प्रमाणात मोसंबी भागाच्या लागवडी होत असल्याचे माहिती अकलूज सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रगतशील बागायतदार अमर काळकुटे यांनी दिली.

01933

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : पळा पळा अधिकारी आले...; दुकाने बंद करून अनेक व्यापारी गेले पळुन

Khadakwasala Bridge : खडकवासला पुलाचे आयुष्य वाढले; जड वाहतूक लवकरच होणार सुरू

Pune News : जलपर्णी काढण्यासाठी चार वर्षांत आठ कोटींची उधळण

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

Bhimashankar Temple Darshan: भीमाशंकर मंदिर सर्वांसाठी खुले! दर्शनाचे नियम आणि वेळेत झाले बदल

SCROLL FOR NEXT