वडापुरी, ता. २९ : ‘‘आजच्या तरुण युवकांनी चांगले शिक्षण घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी जे समाजासाठी कार्य केले त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी समाजासाठी अधिकारी बनून समाजाची सेवा करावी,’’ असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.
वडापुरी (ता. इंदापूर) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भरणे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, माजी उपसरपंच भागवत काटकर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे, ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे, किरण पासगे, पांडुरंग शिर्के, दयानंद चंदनशिवे, दादासाहेब जगताप, अमोल पासगे, सूरज पासगे, दीपक पासगे, संतोष पासगे, बापूराव पासगे, नाना पासगे, तानाजी पिंगळे, प्रकाश चंदनशिवे, बाबूराव पासगे, गणेश चंदनशिवे, चांगदेव पासगे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे विलास गायकवाड, पप्पू चंदनशिवे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव कमिटीच्या वतीने आयोजन केले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सत्यवान पासगे यांनी सूत्रसंचालन केले. मुन्ना पासगे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.