वडापुरी, ता. २५ : इंदापूर तालुक्यात सध्या शेतकरी फळबागेमध्ये आंतरपीक घेऊन उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काटी येथील युवा शेतकरी श्याम इनामे हे डाळिंब बागेत गव्हाचे आंतरपीक घेऊन उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
इनामे यांनी सांगितले की, अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या इंदापूर तालुक्यातील बावीस गावांपैकी दुष्काळी गावांमध्ये काटी गावचा समावेश होतो. त्यामुळे शेतीत मेहनत करून कमी पाण्यावर फळबाग लागवड केली आहे. बागेमधील मोकळ्या जागेत गव्हाचे आंतरपीक घेतले आहे.
सध्या काटी, रेडा, रेडणी, शेटफळ हवेली, अवसरी,परिसरात शेतकऱ्यांचा आंतरपीक घेण्यावर भर आहे.
सव्वा एकर शेतीत डाळिंबाची बाग वर्षापूर्वी लावली आहे. यामध्ये आंतरपीक म्हणून गहू पिकाचा पेरा केला आहे. या फळबागांना विविध औषधे व खताची मात्रा सातत्याने असल्यामुळे गव्हाचे आंतरपीक जोमदार आले आहे. यामुळे यंदा उत्पादन वाढणार आहे.
- श्याम इनामे, शेतकरी
आंतरपिकामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा
फळबागेच्या मध्यभागी मोकळे असलेल्या जागेत आंतरपीक घेतल्याने उत्पन्नात वाढ होत आहे. त्यामुळे फळबागेच्या उत्पन्नात व आंतरपिकांमुळे शेतकऱ्यांच्या दुहेरी फायदा होत आहे.
02430
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.