पुणे

वडापुरी परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय

CD

वडापुरी, ता. २७ : इंदापूर- अकलूज रस्त्यावरील एसटी बसच्या फेऱ्या कमी झाल्याने शिक्षणासाठी इंदापूरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन ते तीन दिवस शाळेत वेळेत जाऊ न शकल्याने हाल होत आहेत.
इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इंदापूर व अकलूज अशा मार्गावर दोन शहरे सोयीचे असल्याने शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी ये- जा करत असतात. मात्र, मागील दोन- तीन दिवसांपासून एसटी गाड्यांच्या कमतरतेमुळे शेकडो विद्यार्थी बावडा, वकीलवस्ती, वडापुरी या ठिकाणी एसटी बसचीअनेक तास वाट बघत उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शाळेत वेळेत न गेल्याने तास बुडाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी इंदापूर येथील महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले की, ‘‘शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होणे ही बाब गंभीर आहे, दोन- तीन दिवसांपासून शेकडो विद्यार्थी रस्त्यावर बसची वाट पाहताना दिसत आहेत. आगार प्रमुखांनी शाळांच्या वेळेनुसार प्रामुख्याने बसेसची व्यवस्था करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी.’’

इंदापूर आगाराच्या बसेस गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये गेल्यामुळे इंदापूर- अकलूज रस्त्यावरील बसेसच्या संख्या कमी झाल्यामुळे दोन- तीन दिवसात या अडचणी आल्या आहेत. मात्र, गुरुवारपासून पूर्ववत बसेस सुरू होतील व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.
- हनुमंत गोसावी, आगार व्यवस्थापक, इंदापूर

02644

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT