पुणे

विद्यार्थ्यांची आसनरचना ७५ वा संविधान दिन, अशोकचक्रात

CD

वडापुरी, ता. २६ : लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान (JBVP) मध्ये संविधान दिन अनोख्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पाच हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान वाचनात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची आसनरचना ‘७५ वा संविधान दिन’ या अक्षरलेखनात व ‘अशोकचक्र’ स्वरूपात करण्यात आली होती.
या कार्यक्रमावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद ,जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेत खास सादरीकरण केले व देशभक्तिपर गीत व ‘ऑपरेशन सिंदूर’वरील नृत्य सादर केले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या कर्तव्य-जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले, तर अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य सांगत सर्वांना समान हक्कांच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वाणिज्य विभागातील विद्यार्थी सिद्धार्थ कांबळे याच्या इंडियन आर्मी (अग्निवीर) निवडीबद्दल सन्मान करण्यात आला. विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी आणि विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ गीताने करण्यात आली. याप्रसंगी सचिव हर्षवर्धन खाडे पाटील , मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, पृथ्वीराज ढोले , हृषिकेश ढोले, प्राचार्य गणेश पवार, प्राचार्य राजेंद्र सरगर,प्राचार्य डॉ सम्राट खेडकर, शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश पवार यांनी केले.


2898

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटींचा निधी मंजूर; मुख्यमंत्री फडणवीसांचा 'ॲक्शन प्लॅन' तयार!

PSL चा करार मोडला अन् IPL शी हातमिळवणी; झिम्बाब्वेच्या खेळाडूच्या निर्णयाने पाकिस्तान चवताळले

Instagram E2EE End : इंस्टाग्रामची प्रायव्हसी संपली! कंपनी वाचू शकणार तुमचे पर्सनल मेसेज; 'या' तारखेपासून एंड टू एंड एन्क्रिप्शन बंद

Latest Marathi News Live Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमधील 'या' कलाकाराची झी मराठीच्या नव्या मालिकेत एंट्री; पहा पहिली झलक, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT