पुणे

‘नीरा भीमा’चे एका दिवसात ६४०० टन उसाचे गाळप

CD

वडापुरी, ता. ३ : शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या चालू असलेल्या २५ व्या ऊस गळीत हंगामात एका दिवसात गाळपाच्या कारखान्याच्या इतिहासामध्ये मंगळवारी (ता.२) ६४०० टन उसाचे गाळप केला व नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. हंगामात सुमारे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने कारखान्याची नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली.
कारखान्याने मंगळवारअखेर १ लाख ८९ हजार ५८२ टन उसाचे गाळप करीत १४०३६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा आजचा साखर उतारा १०.६० टक्के असून, सरासरी साखर उतारा ९.९५ टक्के एवढा आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ३५०० टन असून सध्या सरासरी ५६०० ते ५९०० टन क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे, असे पाटील यांनी सांगितले.
कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आजअखेर ७०१०४११ युनिट वीज एक्स्पोर्ट तर इथेनॉल १६४०११० लिटरचे उत्पादन घेतले आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे बायोगॅस, सेंद्रिय खत आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरु आहेत, असे भाग्यश्री पाटील यांनी नमूद केले.

कारखान्याने एका दिवसामध्ये उच्चांकी ६४०० टन ऊस गाळप करून कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगीता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.


02915

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT