पुणे

प्लॅस्टिक पिशव्यांद्वारे किडींवर मात

CD

वडापुरी, ता. ६ : इंदापूर तालुक्यासह जिल्ह्यातील फळबागांना सध्या सतत बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे इंदापुरातील शेतकरी केळीच्या पिकाचे संरक्षण होण्यासाठी घडांना प्लॅस्टिक पिशव्या व साड्यांचे आवरण घालत आहेत. किडींच्या प्रादुर्भावामुळे फवारणीच्या खर्चातही वाढ होत असल्याने उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी सध्या भुसार पिकात परवडत नसल्याने फळबागांकडे मोठ्या प्रमाणात वळाला आहे. सध्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली, वडापुरी, अवसरी, बेडशीग, बाभूळगाव, भाटनिमगाव, भांडगाव, कांदलगाव, तरटगाव, लाखेवाडी परिसरात केळी पीक प्लॅस्टिक पिशव्या लावून केळीचे संरक्षण करत असताना दिसत आहे.
तालुक्यात सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळी, डाळिंब,पेरू, ड्रॅगन फ्रुटच्या बागा लावल्या आहेत. मात्र, या बागांना देखील वारंवार वातावरणाच्या बदलाचा फटका बसत असून, वेगवेगळ्या रोगांचे प्रादुर्भाव देखील होत आहे. त्यापासून फळांचे नुकसान होऊ नये म्हणून प्लॅस्टिक पिशव्यासह जुन्या व नवीन साड्यांचा वापर बागेसाठी शेतकरी करत असताना दिसत आहे.


सध्याच्या परिस्थितीमध्ये केळी बागायतदार केळीच्या घडांचे शीतलहर तसेच कमी तापमानामुळे केळीवर येणाऱ्या चीलिंगचे संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिक बॅग तसेच केळीच्या प्लॉटला कडेने जुन्या साड्यांचे कुंपण करताना दिसत आहेत. प्लॅस्टिक पिशव्यांमुळे केळी घडांचे कीड, रोग, ऊन, वारा इत्यादींपासून संरक्षण होते. केळी उष्णकटिबंधीय फळ असल्याने तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास फळांवर नकारात्मक परिणाम होऊन फळांचा रंग व चव बिघडते. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केल्यास काही प्रमाणात यावर आपल्याला मात करता येते.
राजेंद्र वाघमोडे, संचालक, महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र इंदापूर

सध्याच्या परिस्थितीत सतत बदलत असलेल्या वातावरणा मूळे तसेच थंडी व उन्हामुळे केळीला डाग पडू नये, बुरशी सारख्या रोगापासून व चीलिंग पासून संरक्षण व्हावे म्हणून प्लास्टिक पिशव्या केळीच्या घडाला व बागेच्या कडेला कापडांचे आवरण घालत आहे.
- बाळासाहेब बागल, केळी उत्पादक शेतकरी, वडापुरी

02924

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT