पुणे

शेतकऱ्याच्या मुलीची उपविभागीय कृषी अधिकारीपदाला गवसणी

CD

वडापुरी, ता. १६ : अवसरी (ता. इंदापूर) येथील शेतकरी आदित्य निवृत्ती शिंदे यांची मुलगी प्रतिक्षा शिंदे- कवडे हिची उपविभागीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव- अवसरी- बेडशिंगे कृषी मंडलमध्ये गेल्या दीड वर्षापासून कृषी सेवक पदावर कार्यरत असणाऱ्या प्रतिक्षा हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून त्यांनी महाराष्ट्रात १९वा क्रमांक प्राप्त केला आहे. अवसरी सारख्या खेडेगावातून व एका शेतकरी कुटुंबाची मुलगी उपविभागीय कृषी अधिकारी या पदावर निवड झाल्यामुळे तिचे इंदापूर तालुक्यात कौतुक होत आहे.
प्रतीक्षा शिंदे हिचे प्राथमिक शिक्षण गायकवाड वस्ती भांडगाव व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी येथे झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण सदाशिव माने विद्यालय अकलूज, बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर, तर एसएससी ॲग्री महात्मा फुले कृषी महाविद्यालय राहुरी या ठिकाणी झाली आहे.
प्रतिक्षा हिने महाराष्ट्र राजपत्रित कृषी सेवा २०२५च्या मुख्य परीक्षेत १९वा क्रमांक मिळवून उपविभागीय कृषी अधिकारी (क्लास वन अधिकारी) पद मिळविले आहे. अवसरी गावात प्रतिक्षा हिचा नागरी सत्कार करून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. गावात पहिल्यांदाच शेतकऱ्याची मुलगी ही उपविभागीय कृषी अधिकारी बनली असल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते.

माझे आई- वडील हे शेतकरी कुटुंबातील असल्याने चांगले शिक्षण घेऊन एक अधिकारी बनायचे हे पहिल्यापासूनच स्वप्न होते. ते स्वप्न आज आई- वडिलांच्या व गुरुजनांच्या आशीर्वादामुळे पूर्ण झाले आहे.
- प्रतीक्षा शिंदे- कवडे

03089, 03090

Satara Political: सत्तेचा नवा अध्याय, की महायुती?; सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने दावा केल्याने वाढली रंगत; कोण कोणासोबत, याची उत्सुकता!

Latest Marathi News Update : टिपू सुलतानाचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पद देतील - सपकाळ

Brain Activity After Death : मृत्यूनंतर ऐकू येतात 'हे' भयानक शब्द, डॉक्टरांच्या संशोधनात थक्क करणारी माहिती समोर

नव्या मालिकेची नवी सुरुवात! 'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका; सोबतीला आहेत हे कलाकार; प्रोमो व्हायरल

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

SCROLL FOR NEXT