वडापुरी, ता. २० : लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित (जेबीव्हीपी) विद्या निकेतन स्कूल अॅंड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅंड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. १९) शिवजयंती व संस्थेचा ८वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी प्रतिरूप शिवाजी महाराज यांची पालखी मिरवणूक सोहळा, लेझीम नृत्य, ढोलपथक, शिवाजी पुतळ्याचे पूजन, शिवप्रतिमा पूजन, शिवजन्माचा पाळणा, विद्यार्थी मनोगत, मान्यवर मनोगत, शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नृत्य सादरीकरण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांचा सन्मान करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषिकेश ढोले, प्राचार्य गणेश पवार, प्राचार्य राजेंद्र सरगर, प्राचार्य सम्राट खेडकर, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.