पुणे

शेतातच मुरघास बनविण्याकडे दूध उत्पादकांचा कल

CD

वडापुरी, ता, २२ : इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी शेतातच यंत्राच्या मदतीने मुरघास निर्मिती करीत आहेत. उन्हाळा वाढत असल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी मका पिकाला मोठी मागणी वाढली आहे. हे पीक जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त असल्याने मुरघास तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
तालुक्यात सध्या एका टनाला हिरव्यागार मकवान पिकाला टनाला ३५०० रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मुरघासासाठी मका देण्याकडेच कल वाढला आहे. मका हे तीन ते चार महिन्यात येणारे पीक आहे. मात्र, उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालल्याने विहिरींना व कूपनलिकेला पाणी कमी आल्याने मका पीक सांभाळणे फार अवघड जात असल्याने शेतकरी पाण्याअभावी अडीच ते तीन महिन्यातच मकवान जनावरांच्या चाऱ्यासाठी देत असताना दिसत आहे.

यावेळी वडापुरी येथील शेतकरी सतीश कदम म्हणाले की, सध्या मका पिकाला शेतातच तीन हजार पाचशे रुपये टनाने दर मिळत असून हे मका पीक एक महिन्याअगोदरच जात असल्याने शेत लवकर मोकळे होत असून पुढील काळात आणखी एखादे पीक घेता येईल.

एक महिना अगोदर मकवान गेल्याने दुहेरी फायदा झाला, यामध्ये मका काढणे, तोडणे, मका करणे, खत, पाणी व मजुराचा खर्च वाचला आहे. जर मकवान तीन ते चार महिने ठेवले तर मुजरांच्या अभावी मका पीक काढणे अवघड होते. त्यामुळे हे मकवान मुरघासासाठी देण्याचे फायद्याचे ठरते.
- सतीश कदम, शेतकरी

जनावरांच्या चाऱ्यासाठी हिरवेगार मकवान घेऊन ते कुटी करून साठवणूक ठेवणे उन्हाळ्यात व पावसाळ्यापर्यंत फायद्याचे ठरते. मकवानाचा मुरघास करून ठेवल्याने व दररोज जनावरांना चारा म्हणून कुटी करून ठेवलेले मकवान खाद्य म्हणून दिल्याने जनावरांच्या दुधात वाढ होते. मुरघासामुळे पेंडीचे प्रमाण कमी लागत असून मकवान पौष्टिक खाद्य आहे.
- सचिन शिंदे, दूध उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC : फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी! श्रीलंकेची सुपर ८च्या पहिल्याच सामन्यात जबदरस्त कामगिरी

Mumbai-Pune: मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना टोलचे पैसे परत मिळणार; पण कधी? जाणून घ्या...

संतापजनक! खाजगी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ शिक्षकांचा वर्षभर वारंवार अत्याचार, कुटुंबाला सांगताच...; काय घडलं?

Satej Patil: झिरवळांच्या कार्यालयात ACB ची धाड, फडणवीसांच्या परवानगी शिवाय नाही; अधिवेशनापूर्वी सतेज पाटलांनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भुरीकवठे-कर्नाटक रस्त्याने दळणवळण सुधारणार; विजयपूरपर्यंत होणार महामार्ग; मंत्री नितीन गडकरींची घाेषणा..

SCROLL FOR NEXT