पुणे

अजित सिडलेस द्राक्ष वाण क्रांतिकारक ठरेल

CD

वडापुरी, ता. २ : ‘‘नैसर्गिक निवड पद्धतीने इंदापूर तालुक्यातील बागायतदारांनी तयार केलेला अजित सिडलेस हा वाण रंगीत द्राक्षामध्ये क्रांतिकारक ठरेल,’’ असे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथे रविवारी (ता. १) जैविक निविष्ठा प्रयोगशाळा उद्‌घाटन व नवीन द्राक्ष वाण नामकरण समारंभात अध्यक्षस्थानावरून पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतीय शेतीला भविष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच उपयुक्त जिवाणू तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. सुमारे १४० वर्षांपासूनचा शेटफळ हवेली व पवार कुटुंबीयांचा असलेला भावनिक ऋणानुबंध आहे. गावामध्ये द्राक्षाच्या क्रांतिकारी वाणास अजित सिडलेस हे नाव दिल्याने एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला अजितदादा नसल्याचे दुःख व्यक्त केले.

दरम्यान, यावेळी पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे यांनी फ्रेष्टा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने उत्पादित केलेल्या निविष्ठा शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचे तसेच अजित सिडलेस द्राक्ष वाण आशादायक ठरणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.
अजित सिडलेस वाण आपल्याच भागात तयार झाले आहे. हे वाण रोग व कीड प्रतिकारक्षम असल्याचे आहे, असे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांनी सांगितले.

राजेंद्र वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास डॉ. निशांत देशमुख, डॉ. नीलेश गायकवाड, डॉ. सोमनाथ पोकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, सिडकोचे सहसंचालक दिलीप ढोले, अनिल देवकाते, दीपक करगळ, बाळासाहेब करगळ, शिवाजी कांबळे, अशोक घोगरे इत्यादी शास्त्रज्ञ,अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

03118

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगावच्या दरेगाव शिवारात 'विषाचा' धूर! अवैध प्लास्टिक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज

Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...

स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

SCROLL FOR NEXT