पुणे

पानशेतमध्ये आदिवासी तरुणाचा खून

CD

वेल्हे, ता. १६ : पानशेत (ता‌. राजगड) येथे आदिवासी कातकरी समाजाच्या युवकाचा दगडाने ठेचून निर्घून खून करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. १५) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. रोहिदास काळुराम काटकर (वय २४, रा. कादवे, ता. राजगड), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे‌. घटनेनंतर मोटरसायकलवरून आलेले सर्व हल्लेखोर फरारी झाले. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी पाच अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
याबाबत वेल्हे पोलिसांनी माहिती दिली की, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर रोहिदास काळुराम काटकर व मोसे (ता. राजगड) येथील विजय पांडुरंग जाधव हे उभे होते‌‌ .त्यावेळी मोटरसायकलवरून आलेले वीस ते पंचवीस वयोगटातील पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अचानक लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रोहिदास काटकर याच्यावर एकाच वेळी सर्व हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांनी जोरदार प्रहार केले. त्यावेळी एका हल्लेखोराने रस्त्यावर पडलेल्या मोठा दगडाने रोहिदास याच्या छातीवर जोरदार प्रहार केला. त्यात रोहिदास याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात विजय जाधव हाही जखमी झाला. याप्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ अविदास काळूराम काटकर याने वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पानशेत बाजारपेठ, पानशेत वसाहत तसेच पुणे- पानशेत रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे पानशेत पोलिस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील, युवराज सोमवंशी, ज्ञानदीप धिवार आदी पोलिस जवानांसह वेल्हे व ग्रामीण पोलिस फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. अधिक तपास वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Daund Municipal Outrage: दौंड नगरपालिकेत कंत्राटदार ‘गब्बर’कडून महिला अधिकार्याचा विनयभंग; सर्वांसमोर अश्लील हावभाव

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

SCROLL FOR NEXT