पुणे

वेल्ह्यात आढळली चौशिंगा हरणाची पिल्ले

CD

वेल्हे, ता. ३० ः किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी शेतकऱ्याच्या गोठ्यात आढळलेली चौशिंगा हरणाची पिल्ले प्राणी उपचार केंद्रात दाखल केल्याची माहिती राजगड तालुका वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहाच्या सुमारास कैलास बोराणे यांच्या गोठ्यात रानातून दोन चौशिंगा हरणाची पिल्ले गोठ्यात आली. याची माहिती वनविभागात समजतात वन विभागाचे परिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे व स्थानिक वनरक्षक शुभांगी जगताप यांनी घटनास्थळी भाव घेतली. यावेळी ही पिल्ले दीड ते दोन महिन्यांची असल्याचे समजल्यानंतर येथील स्थानिक रहिवासी किशोर कोळपे, प्रसाद सांगळे, मंगेश पवार, सचिन गायके, रामभाऊ राजवडे, विनोद दिघे यांच्यासह वनविभागाकडून पिल्लांच्या आईचा शोध घेण्यासाठी वन परिसरामध्ये पिल्ले सोडली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर त्यांची आई त्या ठिकाणी न आल्याने व पिल्ले पावसामुळे व थंडीने गारठली. या पिल्लांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण शक्यता लक्षात घेता, वनपरिक्षेत्र अधिकारी लांडगे यांनी वनविभागाच्या बावधन येथील प्राणी उपचार केंद्राशी संपर्क साधून रात्री उशिरा त्यांच्याकडे सुपूर्त केली.

03268

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Decision on Savings Schemes : PPF, KVP, SSY सह अनेक बचत योजनांच्या व्याज दरांबाबत सरकारने घेतला निर्णय!

एकुलती एक लेक अन् दुसरं लग्न... नवऱ्याच्या आजारपणाबद्दल सांगितल्यावर काय म्हणालेले अभिज्ञाचे आई-वडील?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली दुर्गामातेची आरती

Accenture Lays Off : 'IT'क्षेत्राला 'AI'चा फटका! , ‘Accenture’ ने 11 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Mumbai Local: लोकल प्रवाशांना होणार फायदा! ७ नवे रेल्वे स्टेशन उभारणार, कुठे आणि कोणते? पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT