पुणे

बारामती ॲग्रोच्या पक्ष्यांची चोरी

CD

वेल्हे, ता. ४ : बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या मालकीच्या ८४५ देशी पक्ष्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली असून, वेल्हे ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २) सकाळी आस्कवडी (ता. राजगड) येथे घडली असून, पक्षी चेलाडी फाटा नसरापूर (ता. भोर) येथे मिळून आले आहेत, अशी माहिती वेल्ह्याचे प्रभारी साहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली
याप्रकरणी अक्षय रामदास भांडे, भीमा रामदास काटे (दोघे रा. उरळ, ता. शिरूर), ओम रमेश करंजावणे (रा. किरकटवाडी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर डॉ. राकेश विलासराव तिडके (वय ४६, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. तिडके यांच्या माहितीनुसार, १५ जुलै २०२५ रोजी बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीने ओम रमेश करंजावणे यांना कायदेशीर करार करून आस्कवडी (ता.राजगड) येथील शेडवर ९ हजार ९०० देशी पक्षी संवर्धनासाठी दिले होते. करारानुसार हे पक्षी परत करण्याचे बंधन असताना, ओम करंजावणे याने परस्पर ८४५ पक्षी अक्षय रामदास भांडे आणि भीमा रामदास काटे यांना विकले. आरोपींनी पक्षी स्वतःच्या वाहनात भरून नेले असता ते नसरापूर फाट्याजवळ मिळून आले. फिर्यादी यांनी सांगितले की, आरोपींना कंपनीच्या मालकीची माहिती असूनही आर्थिक फायद्यासाठी ही चोरी केली गेली आहे. यामुळे कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला असून, आरोपींनी मिळून हा कट रचला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ज्ञानदीप धिवार अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT