पुणे

राजगडमधील इच्छुकांमध्ये नाराजी

CD

वेल्हे, ता. १३ : राजगड पंचायत समितीच्या चार गणांसाठी सोमवारी (ता. १३) आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृहात काढण्यात आली. त्यात चार जागांपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत. त्यात एक सर्वसाधारण, तर एक नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गातील आहे. उर्वरित जागा सर्वसाधारण आहेत. सभापतिपद महिलांसाठी आरक्षित आहे. सभापतिपदासाठी जोरदार दावेदारी करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाले आहे.
निवडणूक निरीक्षण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, राजगड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी महेश हरिश्चंद्रे, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी संजय धमाळ आदींसह तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजगड तालुक्यात मागील पंचवार्षिकमध्ये पंचायत समितीची एकहाती सत्ता माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसकडे होती. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पंचायत समितीची खरी लढत ही आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्ये होणार असल्याचे चित्र आहे. मनसेकडून सुद्धा मागील पंचवार्षिकमध्ये काही ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनसुद्धा तालुक्यामध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे.

गणनिहाय आरक्षण- पानशेत- सर्वसाधारण महिला, विंझर- सर्वसाधारण, वांगणी- सर्वसाधारण, वेल्हे बुद्रुक- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

मागील पक्षीय बलाबल
कॉंग्रेस- ३, अपक्ष- १

प्रमुख समस्या- रोजगार निर्मितीचा अभाव, जलजीवनअंतर्गत अर्धवट कामे, महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, प्राथमिक शिक्षण मागास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT