पुणे

रांजणेतील हिट अँड रन प्रकरण; आरोपीवर अखेर मनुष्यवधाचा गुन्हा

CD

वेल्हे, ता. १० : खानापूर -पाबे घाट रस्त्यावरील रांजणे (ता.राजगड)येथे घडलेल्या हिट अँड रनप्रकरणी चालकाविरोधात अखेर वेल्हे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात बोलोरो जीपखाली चिरडून राजगडचे सेवा निवृत्त वनकर्मचारी भरत सर्जेराव दारवटकर (वय ६०, रांजणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
राहुल शिवाजी यादव (वय ३८, रा. पुणे) असे या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो अभियंता आहे. हा अपघात शनिवारी (ता. १) सकाळी नऊच्या सुमारास खानापूर-पाबे घाट रस्त्यावरील रांजणे गावच्या हद्दीत घडला. रांजणे-सिंहगड भागातील जागरूक नागरिक व वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांच्यासह पोलिस पथकाने १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. तसेच पोलिसांनी सखोल तपास करत हिट अँड रनचा प्रकार उघडकीस आणला आहे. या अपघाताची माहिती अशी की, राहुल यादव हा आपल्या पत्नी समवेत शनिवारी (ता.१) सकाळी पुण्याहून खानापूर पाबे घाट रस्त्याने बोलोरो (क्र. एमएच १२ पीएच ८८२६) ने वेल्हेकडे भरधाव वेगाने निघाला होता. त्यावेळी रांजणे येथून सोमजाई मंदिर मार्गे मयत भरत दारवटकर हे मोटारसायकलीवरून पुण्याकडे निघाले होते. रांजणे येथे बोलोरोने दारवटकर यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली त्यात चिरडून ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर राहुल यादव न थांबता निघून गेला होता.

ग्रामस्थ व मृताच्या नातेवाइकांनी आटोकाट प्रयत्न करून सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे पांढऱ्या रंगाची बोलोरो जीपचा शोध लावला. त्याचे फुटेज वेल्हे पोलिसांना दिले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.
- ज्ञानेश्वर दारवटकर, अध्यक्ष, भोर-राजगड तालुका नागरी कृती समिती

मृत्यूस कारणीभूत असलेले वाहन जप्त करण्यात आले असून आरोपी फरार आहे.
- किशोर शेवते, सहायक पोलिस निरीक्षक, वेल्हे

03345

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Blast: खोली भाड्याने घेऊन साठवलं होतं बॉम्ब बनवण्याचं साहित्य; काही तासांपूर्वीच ३०० किलो आरडीएक्स जप्त, दिल्ली स्फोटाशी काय कनेक्शन?

Delhi Red Fort blast Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहचले ; जखमींचीही भेट घेणार

Delhi Bomb Blast Fire Officer Video : दिल्ली स्फोटाच्या घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

SCROLL FOR NEXT