पुणे

अनधिकृत बांधकामांवर कारवाई

CD

वेल्हे, ता. २७ : पानशेत आणि वरसगाव धरण (ता. राजगड) क्षेत्रात जलसंपदा विभागाच्या सरकारी जागांवर अतिक्रमण केलेल्या तीनशेहून अधिक जणांना नोटीस बजावल्या आहेत. राजगड तालुका धरण क्षेत्र परिसरातील पुणे पानशेत रस्त्यावरील हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊस अशा ४० हून अधिक ठिकाणी गुरुवार (ता. २७) पर्यंत कारवाई केल्याची माहिती खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी दिली.
जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या नोटिसींमुळे ५० वर्षांहून अधिक काळ रहात असलेल्या धरणग्रस्त रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जलसंपदा विभागाच्या सरकारी जागांवर वसलेल्या ३८ गावांना वेळोवेळी मागणी करूनही
गावठाणाचा दर्जा मिळालेला नसल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.
पानशेत आणि वरसगाव धरण निर्मितीपासून हजारो धरणग्रस्त शेतकरी धरण तीरावरील संपादित जमिनीवर घर बांधून राहत आहेत. दोन्ही धरण क्षेत्रातील ३८ गावे संपादित जमिनीवर वसली आहेत.
यामध्ये आंबेगाव खुर्द, वरघड, कुरवटी, आंबेगाव बुद्रुक, ठाणगाव, घोडशेत, कोशिमघर, काम्बेगी, माणगाव, पोळे, भालवडी, शिरकोली, आडमाळ, साईव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे. या गावांसाठी ग्रामपंचायती सुद्धा आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयांसह, समाज मंदिर, स्मशानभूमी, जिल्हा परिषदेच्या शाळा, जनावरांचे दवाखाने, पाणीपुरवठा योजना या अनुषंगाने शासनाने या ठिकाणी करोडो रुपयांचा निधी खर्च केला आहे. असे असताना जलसंपदा विभागाच्या वतीने संबंधितांना सद्यःस्थितीला नोटीस बजावल्याने येथील हजारो धरणग्रस्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पुणे जिल्हा कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवानराव पासलकर म्हणाले, ‘‘या परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून या ठिकाणी धरणांची निर्मिती केली आहे. धरण बांधून शिल्लक राहिलेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना ताब्यात देण्यात याव्या. धरणग्रस्त वसाहतींवर कारवाई करण्यात येऊ नये. याबाबतचे निवेदन पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांच्याकडे दिले आहे.’’

पानशेत, वरसगाव, खडकवासला धरण क्षेत्रातील सरकारी जागांवरील तसेच मुख्य पुणे-पानशेत आणि इतर ठिकाणच्या जलसंपदा विभागाच्या जागेवरील हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाउसवर कारवाई करण्यात येत आहे. सरकारी मालकीच्या जमिनीवरील सर्व अतिक्रमणांना नोटीस बजावल्या आहेत. धरण क्षेत्रातील पुनर्वसित गावांतील घरांनाही नोटीस दिल्या आहेत. आज अखेरपर्यंत परिसरातील पहिल्या टप्प्यात हॉटेल आणि इतर व्यावसायिक अतिक्रमणे काढण्यात येत असून राजगड तालुका धरण क्षेत्र परिसरातील ४० अनधिकृत बांधकामावर कारवाई केली असून ती सुरूच राहणार आहे.
- मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

BCCI ला सचिन तेंडुलकर नकोसा झालेला? निवृत्तीबाबत विचारणा केलेली; मास्टर ब्लास्टरला बसलेला धक्का, १३ वर्षानंतर सत्य समोर...

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

SCROLL FOR NEXT