पुणे

करंजावणे येथील दुचाकी अपघातामध्ये एकाचा मृत्यू

CD

वेल्हे, ता. २२ : करंजावणे (ता.राजगड) वेल्हे- नसरापूर रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना धडकल्यानंतर झालेल्या अपघातामध्ये एक जणाचा मृत्यू तर दोन जण गंभीर झाले असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. हा अपघात शनिवारी (ता. २१) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घडला असून याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. दीपक विनोद मोरे (वय २०, रा. बिबबेवाडी, ता. हवेली) या तरुणाचा मृत्यू झाला असून प्रदीप राजू यंटमन, बिबवेवाडी ता. हवेली व सुलतान रसूल शेख राहणार कातवडी (ता. राजगड) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कविता विनोद मोरे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सुलतान शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंजावणे गावच्या हद्दीत वेल्हे नसरापूर रस्त्यावर सुलतान शेख हे मोटर सायकल (क्र. एमएच ४७ पीबी ०२९८) ही नसरापूर बाजूकडे जात असताना निष्काळजीपणे रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात दुचाकी चालवून समोरून येणारा ऍक्टिव्ह मोटरसायकल (एमएच १२ टीजे ९०१२)ला समोरून धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदीप धिवार पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT