वेल्हे, ता. २५ ः खांबवडी (ता. राजगड) गावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे लाल मातीचे उत्खनन करून तिची वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २४) चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, वाहतूक करत असलेले डंपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी हवेली उपविभागीय कार्यालयातील पोलिस कर्मचारी विकी अंगद खोमणे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेपाच ते ७ वाजण्याच्या सुमारास खांबवडी परिसरात काही डंपरमधून बेकायदेशीरपणे लाल मातीची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील फिर्यादी विकी अंगद खोमणे व त्यांच्या पथकाने सापळा लावून ही कारवाई केली.
या कारवाईत चारही डंपरमध्ये प्रत्येकी पाच ब्रास याप्रमाणे एकूण २० ब्रास लाल माती (किंमत अंदाजे ४० हजार रुपये) बेकायदेशीरपणे भरलेली आढळली.
याप्रकरणी पोलिसांनी संतोष तीरसिंग काळे (रा. आंबवणे, ता. राजगड), राजेश बेदो यादव (रा. अडवली, ता. राजगड)
पिंटू देसू जाधव (रा. आंबवणे, ता. राजगड), तारकेश्वर सीताराम पासवान (रा. अडवली, ता. राजगड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.