पुणे

निवी येथे तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

CD

वेल्हे, ता. २६ : निवी (ता. राजगड) येथे तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.२५) घडली. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सचिन पांडुरंग कचरे (वय २०, रा. निवी, ता. राजगड) मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे वेल्हे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन सकाळपासूनच घरी नसल्याने घरातील सर्वजण त्याचा शोध घेत होते. घराजवळील असलेल्या विहिरीजवळ सचिनची चप्पल आढळून आली. त्यानंतर पोलिस पाटील उत्तम गायकवाड यांनी वेल्हे पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधला. यावेळी तानाजी भोसले, संदीप सोलस्कर, संजय चोरगे, वैभव भोसले, उत्तम पिसाळ, विक्रम बिरामणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिस कर्मचारी प्रदीप कुदळे, शुभम कदम यांच्यासह सचिन विहिरीत शोध घेतला. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सचिनला विहिरीतून बाहेर काढले. उपचारासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी वेल्हे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

03588

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

मालिकेतील वडिलांनीच खऱ्या आयुष्यात केलेलं मिताली मयेकरचं कन्यादान; म्हणाले, 'मला मुलं नाहीत पण...'

Solapur Jangam Samaj : जनगणनेत 'हिंदू' म्हणूनच नोंद करणार; जंगम समाजाचा निर्धार, शिवाचार्यांविरोधी वक्तव्याचा एकमुखाने निषेध

Paithan News: यंदाच्या नालेसफाईवर विशेष लक्ष द्यावे; पैठण पालिकेकडून अपेक्षा : वरवरच्या स्वच्छतेऐवजी गाळ काढण्याची गरज

Panchgani Pinewood School: पाचगणीतील पाईनवुड इंटरनॅशनल स्कूलची मान्यता धोक्यात; शिक्षण विभागाची मोठी कारवाई, मान्यता रद्दीची शिफारस..

SCROLL FOR NEXT