पुणे

हिंगणेवाडी शाळेवरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले

CD

वालचंदनगर, ता. १० : हिंगणेवाडी (ता.इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दोन खोल्यामधील पत्रे शनिवारी (ता.८) झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उडून गेले.
इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील भवानीनगर, सणसर, हिंगणेवाडी, मानकरवाडी परिसरामध्ये शनिवारी सातच्‍या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी दुकानांचे फलक वाऱ्यामुळे उडून गेले. हिंगणेवाडीमधील प्राथमिक शाळेच्या भिंती मातीच्या असून, त्या धोकादायक बनल्या आहेत. तसेच पत्रे ही जीर्ण झाले आहे. पत्रे उडाल्याच्या पार्श्वभूमीवर‍ शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. याबाबत सणसरचे माजी उपसरपंच व भाजप नेते संतोष चव्हाण यांनी सांगितले की, सध्या राज्यामध्ये भाजप-सेनेचे सरकार असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून शाळेसाठी निधी मंजूर केला जाईल तसेच शाळेच्या नवीन इमारतीचे काम मार्गी लावणार आहे. दरम्यान, पत्रे उडून गेल्याची पाहणी माजी उपसरपंच संतोष चव्हाण, मुख्याध्यापक हर्षा जाधव, गुणवंत पाठक, पवन चव्हाण यांनी केली.

--03108

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT