पुणे

नीरा नदीने तारले अन् डाव्या कालव्याने मारले

CD

वालचंदनगर, ता. ९ ः नीरा डावा कालवा फुटीमुळे इंदापूर तालुक्यातील पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांची कालव्याच्या पाण्यावरती असलेली पिके पाण्याअभावी जळाली. तर दुसरीकडे नीरा नदीतील बंधाऱ्यातील पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके तरारली. नीरा नदीने शेतकऱ्यांना तारले. तर दुसऱ्या नीरा डाव्या कालव्याने मारले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

इंदापूर तालुक्यातील पश्‍चिम भागातील निमसाखर, निरवांगीच्या परिसरातील काही शेतकरी नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावर तर काही शेतकरी नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. नीरा नदी व नीरा डावा कालवा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. मात्र, सुरू वर्षी नीरा डाव्या कालव्याला फुटीचे ग्रहण लागले. कालवा फुटीमुळे कालवा सुमारे २६ दिवस बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे उन्हाळ्यातील पाण्याचे आवर्तन मिळाले नाही. दोन महिन्यापासून पिकांना पाणी नसल्यामुळे पिके जळाला आहे. आज ही अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना उन्हाळी हंगामातील पाणी मिळालेच नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तर दुसरीकडे नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना नीरा नदीच्या बंधाऱ्यातील पाणी वरदान ठरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी नदीतून पाइपलाइनद्वारे पाणी आणल्यामुळे उन्हाळ्यात ही पिके तरारली असून चालूवर्षीचा उन्हाळा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे.

नीरा डावा कालवा व नीरा नदीतील बंधाऱ्यांचे नियोजन पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांकडेच आहे. बंधाऱ्यातील गळतीचे प्रमाण अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या मदतीने कमी केले होते. यामुळे मे महिन्यामध्ये ही मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, कालवा सलग तीन वेळा फुटल्यामुळे दुरुस्तीचे काम लवकर न झाल्यामुळे शेतकऱ्यांना कालवा फुटीचा गंभीर परिणाम भोगावा लागले असून कालवा फुटी शेतकऱ्यांच्या मुळावर आली.

गेल्या तीन महिन्यांपासून उसाला कालव्याचे पाणी मिळाले नाही. सध्या जमिनीला हातभर भळी (चिरा) पडल्या असून तीन एकर ऊस जळाला आहे.
- जयंत रणवरे, शेतकरी, निमसाखर

दरवर्षी नीरा नदीचे पाणी लवकर आटते. मात्र, सुरू वर्षी बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणीसाठा असून बंधाऱ्यातील पाण्यामुळे नऊ एकरातील ऊस हिरवागार आहे.
- शिवराज रणवरे, निमसाखर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. लातूरमधील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT