पुणे

‘छत्रपती’ने शब्द पाळला

CD

वालचंदनगर, ता. २८ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये पहिल्या पंधरवड्यामध्ये गाळप झालेल्या उसाचा पहिला हप्ता एकरकमी ३ हजार रुपये प्रतिटनाप्रमाणे सभासदांच्या व गेटकेनधारकांच्या खात्यावर जमा केला असून, कारखान्याने दिलेल्या शब्द पाळला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या चालू वर्षीच्या गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. कारखान्याने सोमवारअखेर (ता. २७) ७५ हजार टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला. कारखान्याने सभासद व गेटकेनधारकांना उसाला प्रतिटन तीन हजार रुपये एकरकमी पहिला हप्ता देण्याचे जाहीर केले होते. पहिल्या पंधरवड्यामध्ये गाळप झालेल्या सर्व उसाचा पहिला हप्ता तीन हजार रुपयांप्रमाणे सभासदांच्या खात्यावर जमा केला आहे. तसेच, उसाच्या खरेदीपोटी ऊस उत्पादक सभासदांना व गेटकेनधारकांना दिल्या जाणाऱ्या उसाच्या पहिल्या हप्त्याबरोबरच बिगर अॅडव्हान्स ऊस तोडणी व वाहतूकदारांचे पहिल्या पंधरवड्याचे बिलदेखील मंगळवारी (ता. २८) जमा केले.
चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये श्री छत्रपती कारखान्याने ९ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वर्षी सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्या कारखान्याच्या सभासदांनी आपल्याच छत्रपती कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT