पुणे

भगतवाडीतील शामलचे यूपीएससीत यश

CD

वालचंदनगर, ता. २५ : इंदापूर तालुक्यातील भगतवाडी गावातील शेतकरी कुटुंबातील शामल कल्याणराव भगत हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळवून आईचे स्वप्न पूर्ण केले.
इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या भगतवाडी गावामधील कल्याणराव भगत यांच्या शामल या मुलीने २५ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास होत भगतवाडी गावाचे नाव राज्यामध्ये चमकाविले. शामलचे वडील कल्याणराव यांचे शिक्षण चौथी तर आई लक्ष्मीचे शिक्षण सातवी पास होत्या. आईला सुरूवातीपासुन मुलीने शासकीय अधिकारी व्हावे असे वाटत होते. शामलचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. दहावीपर्यंत शिक्षण गावाजवळील नीर-निमगावमधील अनंतराव पवार माध्यमिक विद्यालयामध्ये तर अकरावी आणि बारावी पर्यंतचे शिक्षण सराटीमधील जिजामाता प्रसारक मंडळ या शैक्षणिक संकुलामध्ये झाले. सुरवातीपासून कलेक्टर होण्याचे शामलचे स्वप्न होते. या स्वप्नाला आई लक्ष्मीबाई यांनी बळ दिले. पुण्यामध्ये बीएस अॅग्री सुरु असताना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याने स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले. शिक्षण घेत असताना भाऊ नवनाथ, विनोद आणि मच्छिंद्र यांनी मदत केल्याचे शामल यांनी सांगितले.

आनंदाचा दिवस पाहण्यासाठी आई नाही...
शामलने शिक्षण घेऊन शासकीय अधिकारी व्हावे अशी आईची खूप इच्छा होती. दहावीनंतर शिक्षण बंद होण्याची वेळ आली होती. मात्र आई शामलच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिल्याने शिक्षण पूर्ण करता आले. नोव्हेंबर २०२३ मध्ये आईचा आजारपणामुळे मृत्यू झाला. तिच्या १३ दिवशी इंटरव्ह्यूची तारीख होती. आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. आज मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळवले आहे. मात्र यश पाहण्यासाठी आई जगात नसल्याचे शामल भगत यांनी सांगितले.

प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये अडचणी येतात. अडचणींवर मात करून यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेवढ्या अडचणी येतील तेवढे जीवनामध्ये व्यक्ती कणखर बनत असतो.
शामल भगत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT