पुणे

शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा : जयंत पाटील

CD

वालचंदनगर, ता.२९ : ‘‘शरद पवार हे महाराष्ट्राचा आत्मा असून, संपूर्ण राज्य त्यांच्याकडे पाहत आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या अश्‍वमेधाचा वारू शरद पवार यांनी अडवला आहे. त्यामुळे मोदी सातत्याने साहेबांवर टीका करीत आहेत,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिले.
सणसर (ता.इंदापूर) येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये सोमवारी (ता. २९) पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड, भेद वापरून सत्तेवर येण्याचे ठरवले आहे. त्यांनी पवार साहेबांना पुण्यातील सभेमध्ये भटकत्या आत्म्याची उपमा दिली आहे. मात्र, साहेब हे महाराष्ट्राचा आत्मा असून, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी त्यांना निश्‍चित काय ते कळेल.

यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, सागर मिसाळ, आबासाहेब निंबाळकर, अमोल भोईटे, अनिकेत निंबाळकर उपस्थित होते.

पाटील म्हणाले..
- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक राज्यामध्ये जाऊन विरोधकांवर टीका करतात
- आपले काम न सांगता विरोधकांवर टीका करणे मोदी यांना शोभत नाही
- नरेंद्र मोदी दहा वर्षांत काय केले ते सांगत नाहीत.
- सध्या मोदी यांच्या तोंडातून ४०० पारचा नारा येत नाही.
- २०० पार ही होईल असे वाटत नाही.
- राज्यातील जनता मोदी व शहा यांच्यावर चिडली आहे
- दोघांनी राज्यामध्ये दोन मराठी माणसांचे पक्ष फोडले
- महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकविण्याच्या तयारी आहेत

अमित शहा यांनी गुजरातसाठी काय केले?
शरद पवार यांनी केलेल्या विकासाने सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल केला आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले हे विचारण्याऐवजी अमित शहा यांनी गुजरातसाठी काय केले हे सांगावे.

जीएटी जाचक कर असून, प्रत्येक माणूस वर्षभरामध्ये लाख ते सव्वा लाख रुपये जीएटी भरत आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. देशाचे कर्ज फेडण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये भाजप जीएसटी करामध्ये वाढ करू शकतो.
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)

04201

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT