पुणे

अंथुर्णेकरांनी दिला भक्तिभावाने निरोप

CD

वालचंदनगर, ता. ९ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला अंथुर्णेकरांनी भक्तिभावाने निरोप दिला. पालखी सोहळ्याचे शेळगाव फाटा येथे शिरसटवाडी, शेळगाव परिसरातील नागरिकांनी उत्साहात स्वागत केले.
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अंथुर्णे येथील मुक्काम आटोपून निमगाव केतकीच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. अंथुर्णेकरांनी भक्तिभावाने संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याला निरोप दिला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती. पावसामुळे वारकऱ्यांना विसाव्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पावसाचे वातावरण पाहून शक्य तेवढी निवाऱ्याची सोय करण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे सोमवारी रात्री दर्शनासाठी कमी गर्दी झाली होती. पहाटे नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटे पाच वाजता आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे, सरपंच प्रवीण साबळे व त्यांच्या पत्नी माधुरी यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांना अभिषेक घालून काकड आरती केली.
अंथुर्णेकरांनी निरोप दिल्यानंतर पालखी सोहळ्याचे शेळगाव फाट्यावर शेळगाव व शिरसटवाडी परीसरातील नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. शेळगाव, शिरसटवाडी, हगारेवाडी, रणगाव परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गदी केली होती. यावेळी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, श्री छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक अॅड. लक्ष्मण शिंगाडे, शिरसटवाडीचे सरपंच जयकुमार रावण, मोहन दुधाळ, नितीन कदम, कर्मयोगी कारखान्याचे संचालक आबासाहेब शिंगाडे, शेळगावच्या सरपंच ऊर्मिला शिंगाडे, उपसरपंच रेश्‍मा जाधव, माजी उपसरपंच नितीन जाधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

Latest Marathi News Live Update : हुपरीतील दहा गुंड वर्षभरासाठी हद्दपार

Ashok Kharat Case Update : पीडित महिला आमदाराला भेटली, व्हिडिओही दाखवले, पण त्याने.... अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा !

Chhatrapati Sambhajinagar: अकरावीसाठी कागदपत्रे तयार ठेवा; ऑनलाइन प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आवाहन

Sangamner fuel Shortage: संगमनेरमध्ये इंधन भरण्यासाठी दुचाकींच्या रांगा; दर वाढण्याची भीती? अनेक पंपांचा साठा संपला!

SCROLL FOR NEXT