पुणे

कळंब, निमसाखर, बोरीमधील अवैध धंद्यांवर पोलिसांचे छापे

CD

वालचंदनगर, ता. २२ : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कळंब, बोरी, निमसाखर परीसरातील अवैध धंद्यांवर वालचंदनगर पोलिसांनी छापे टाकून चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब गावातील जिल्हा बँकेच्या शाखेजवळील झाडाखाली सोमवारी (ता. २१) दुपारी साडेबाराच्या सुमारास बापू यशवंत चितारे हा उमेश घोडके (रा. कळंब) याच्या सांगण्यावरून कल्याण मटका नावाचा जुगार नागरिकांना खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यात चितारे याच्याकडून ७९० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला.
बोरी गावामध्ये दुपारी सव्वाचारच्या सुमारास सुजाता संतोष कुचेकर (वय ५५, रा. बोरी) ही महिला बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला. १०५० रुपयांच्या ३० बाटल्या जप्त करून गुन्हा दाखल केला.
निमसाखरमध्ये सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ताडी विक्रीच्या अड्ड्यावर छापा टाकून अनिल महेश भंडारी (वय ३३ रा. निमसाखर) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून १०५० रुपयांची ताडी जप्त करून गुन्हा दाखल केला. छाप्यात वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, हवालदार अभिजित कळसकर, महेश पवार, रामचंद्र आढाव, विजय मदने, प्रमोद टापसे यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT