पुणे

कळंब येथील विश्‍वासराव महाविद्यालयचा कुस्तीत ‘सुवर्ण’ विजय

CD

वालचंदनगर, ता. २७ : कळंब (ता. इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यायतील चार विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा विभागीय आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळविले आहे. यातील तीन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक व एका विद्यार्थ्यांने रजत पदक पटकावले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या कुस्ती स्पर्धा नुकत्याच सोमेश्‍वर (ता. बारामती) मधील मु.सा. काकडे महाविद्यालयामध्ये पार पडल्या. तसेच मुलींच्या स्पर्धा विंझरमधील अमृतेश्‍वर महाविद्यालयामध्ये पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील बाबासाहेब तरंगे याने फ्री स्टाइल कुस्तीमधील ९७ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक, ८६ किलो वजन गटामध्ये महेश खोमणे याने सुवर्णपदक पदक, कुस्तीमधील ग्रेको रोमन क्रीडा प्रकारामध्ये सुदेश बागल याने ७७ किलो वजन गटामध्ये रजतपदक, तर मुलींच्या ६५ किलो वजन गटामध्ये काजल जाधव हिने सुवर्णपदक पटकावले आहे.
या चार खेळाडूंची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलांच्या आंतरविभागीय स्पर्धा नाशिकमध्ये होणार आहेत.
विजेत्या खेळाडूंचे इंदापूर ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग, विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय केसकर, उपप्राचार्य प्राध्यापक ज्ञानेश्वर गुळीग यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. सुहास भैरट यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभवबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, तुम्ही कोणत्याही मुलाला...

Video: 'असा' रचला केतनच्या खुनाचा कट; सिया अन् चेतनचा कॅफेतला व्हिडीओ आला, हातात हात देऊन बसले अन् केलं प्लॅनिंग

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

SCROLL FOR NEXT