वालचंदनगर, ता. ११ : आनंदनगर (ता. इंदापूर) येथील श्रद्धा मंगेश शिंदे (वय २६) या गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी महेश प्रकाश शिंदे (वय ३६, रा. आनंदनगर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ९) दुपारी एकच्या सुमारास श्रद्धा शिंदे हिने घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रद्धा ही गरोदर होती. श्रद्धा व पोटातील बाळाला वाचविण्यासाठी तातडीने लासुर्णेमधील खासगी दवाखान्यात व नंतर बारामतीतील, खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारपूर्वी तिचा आणि पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रतिलाल चौधर तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.